जरांगेंची तब्येत खालावली

जरांगेंची तब्येत खालावली

जालना, १४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर व्हावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आहे. त्यांनी दहा तारखेपासून बेमुदत उपोषण आणि जलत्याग केला आहे. जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मात्र त्यांची प्रकृती खालावली आहे. अन्न, पाणी, औषध न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला आहे. सगेसोयरेंना आरक्षण मिळावे यासाठी कायदा करा या मागणीवर जरांगे ठाम आहेत. जरांगेंची तब्येत बिघडल्यामुळे मराठा आंदोलक चिंतेत आहेत.

उपोषणामुळे काय परिणाम होतो ?

पाणी घेतले नाही तर डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो
रक्ताभिसरणावरावर तसेच शरीरातील पेशींवर आणि विविध अवयवांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो
अवयव निकामी होऊ शकतात
हृदयविकाराचा धोका

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version