नेरळ, १३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारताला १९८३ मध्ये पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा क्रिकेटपटू कपिल देव आता सेंद्रीय शेती करणार आहे. त्याने महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात नेरळ येथे १६ एकर शेतजमीन खरेदी केली आहे. या व्यवहारासाठी कपिलने १.०३ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. कपिलची शेतजमीन मोग्रज गावाजवळ आहे. या जमिनीशी संबंधित आर्थिक व्यवहार पूर्ण झाला आहे आणि जमिनीची नोंदणी पण झाली आहे. यापूर्वी कपिल देव यांनी कोथिंबे गावामध्ये २०२२ साली २५ एकर जागा विकत घेतल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या जमिनी घेऊन कपिल देव नेमकं करणार तरी काय, यावरून चर्चेला उधाण आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.