कातकऱ्यांना मिळाल्या हक्काच्या जमिनी

कातकऱ्यांना मिळाल्या हक्काच्या जमिनी

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : सावकारांच्या जाचातून सोडविलेल्या जमिनीची मालकी सतरा कातकरी कुटुंबांना परत मिळाली. हे सर्व कातकरी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघामधील रहिवासी आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे त्यांना हक्काच्या जमिनीचा सातबारा मिळाला.

प्रामुख्याने पालघर, रायगड जिल्ह्यातील कातकरींच्या जमिनी सावकारांनी बळकावल्या आहेत. या जमिनी सोडवून कातकरी कुटुंबांना परत देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये एक समिती स्थापन केली होती. चावडी वाचनाचे आदेश दिले होते. या प्रयत्नांमुळेच सतरा कातकरी कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या जमिनीचा सातबारा मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केवळ सातबारा दिले नाहीत, तर त्यांची पुढचीही व्यवस्था करुन दिली. आता त्यांना जागेचा ताबा द्या, शासकीय खर्चाने त्यांच्या जागेवर मालकी पाट्या लावून द्याव्या, योग्य सीमांकन आखून द्या, असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version