नाशिक, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : सोमवार १९ फेब्रुवारीपासून गोदावरी नदीच्या घाटावर दररोज आरती केली जाणार आहे. ही गोदेची शासकीय महाआरती असेल. गोदेच्या शासकीय महाआरतीवरून रामतीर्थ सेवा समिती आणि पुरोहित संघात वाद सुरू होता. या वादावर अखेर तोडगा निघाला. ग्रामसभेत चर्चेतून तोडगा काढण्यात आला. साधू, महंत,पंचवटी परिसरारील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आणि राजकीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेतून वादावर तोडगा निघाला. आजच्या या निर्णयानंतर रामतीर्थ सेवा समिती काय भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.