पाकिस्तानमध्ये त्रिशंकू स्थिती

पाकिस्तानमध्ये त्रिशंकू स्थिती

इस्लामाबाद, १० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली अर्थात लोकसभेसाठी गुरुवारी मतदान झाले. मतमोजणी गुरुवार संध्याकाळपासूनच सुरू झाली आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार २५१ जागांचा निकाल जाहीर झाला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पाकिस्तानमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत ३४२ जागा आहेत. यापैकी २६६ जागांवर थेट निवडणूक पार पडली. उरलेल्या जागा महिला आणि अल्पसंख्यांकांसाठी आरक्षित आहेत.

इमरान खान : पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पक्षाचा पाठिंबा असलेले विजयी उमेदवार : ९१
नवाझ शरिफ : पाकिस्तान मुस्लीम लीग – नवाझ शरिफ गटाचे विजयी उमेदवार : ७१
बिलावल भुट्टो : पाकिस्तान पीपल्स पार्टीचे विजयी उमेदवार : ५४
फजल-उर-रहमान : जमीयत उलेमा-ए-इस्लाम – फजल गटाचे विजयी उमेदवार : २
इतर विजयी उमेदवार : ३३

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version