राशपच्या शहराध्यक्षावर अजित पवार कडाडले

राशपच्या शहराध्यक्षावर अजित पवार कडाडले

पिंपरी – चिंचवड, १० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पिंपरी – चिंचवडचे राशपचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी जाहीर सभेत बोलताना सुनावले. ‘तुमच्या आजूबाजूचा एक शहाणा, दीड शहाणा म्हणाला, की अजित पवार कॉन्ट्रॅक्टर घेऊन फिरतो. तुझ्या बापाने मी कॉन्ट्रॅक्टर सोबत फिरतो ते पाहिलं का? काहीही बोलायचं आणि आरोप करायचे’ या शब्दात अजित पवार यांनी तुषार कामठेंना सुनावले.

याआधी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या राशपच्या मेळाव्यात शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केला होता. अजित पवार यांनी केवळ ठेकेदारांचा आणि त्यांच्या विचारांच्या लोकांचा विकास केला, असे राशपचे शहराध्यक्ष तुषार कामठे म्हमाले. कामठेंच्या या वक्तव्याला अजित पवारांनी त्यांच्या पद्धतीने जाहीर सभेत उत्तर दिले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version