पुणे, ९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसने प्रवास करताना मोबाइलवर हेडफोन किंवा इअरफोनशिवाय गाणी ऐकल्यास, चित्रपट वा वेब सीरिज बघितल्यास अथवा मोठ्या आवाजात बोलल्यास संबंधित प्रवाशावर कारवाई होणार आहे. पीएमपी प्रशासनाने मोबाईलचा आवाज करणाऱ्यांवर कायद्यानुसार, दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. ‘पीएमपी’कडून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात बससेवा पुरविण्यात येते. त्यासाठी ३९६ मार्गांवर दररोज १७८५ बसगाड्या धावतात. त्यातून दररोज १३ लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.