नागपूर, ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : नागपूर – मुंबई हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला राज्यातील आणखी १२ जिल्हे जोडले जाणार आहेत. समृद्धी महामार्गाच्या या विस्तारीत प्रकल्पासाठी ६० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. समृद्धी महामार्ग हा ७०१ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. हा देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नगर, ठाणे हे दहा जिल्हे समृद्धी महामार्गाद्वारे जोडण्यात आले आहेत. आता या मार्गाचा आणखी १२ जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहे. विस्तारीत योजनेसाठी भूसंपादन एप्रिल २०२४ मध्ये सुरू होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.