वाढवण बंदराला सीआरझेड मंजुरी

वाढवण बंदराला सीआरझेड मंजुरी

वाढवण, ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : जगातील पाचवे आणि देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून विकसित होऊ घातलेल्या वाढवण बंदराला किनारपट्टी नियमन क्षेत्रासंदर्भातील (सीआरझेड) मंजुरी देत त्याची शिफारस केंद्रीय पर्यावरण व वन विभागाकडे केली आहे. प्राधिकरणाच्या मंगळवारी झालेल्या १७२व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. हा बंदर उभारणीतील महत्त्वाचा टप्पा आहे. वाढवण बंदर हे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील १८० चौरस किलोमीटर क्षेत्रावर उभे होणारे नवे बंदर आहे. या बंदरासाठी एकूण ६५ हजार ५४४ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यापैकी ६१ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. एकूण गुंतवणुकीपैकी ४१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक टर्मिनल इमारत उभारणीसाठी होणार आहे. बंदर उभारणीसाठीच्या पर्यावरण मंजुरीची तयारी सुरू आहे. बंदर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणांतर्गत (जेएनपीए) उभारले जाणार आहे. सर्व प्रकारच्या हवामानात कार्यरत करण्यासाठी हे बंदर उभारले जाणार आहे. बंदर उभारणी प्रकल्पाला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.

वाढवण बंदर
एकूण क्षेत्र : १८० चौरस किमी
टर्मिनल आणि बंदर : ३० चौरस किमी
सागरी सवंर्धन आणि इतर सुविधा : १५० चौरस किमी
क्षेत्र : डहाणू किनारपट्टीपासून ६ किमी खोल समुद्रात
एकूण टर्मिनल : ९
लाटांच्या क्षेत्रात किनारपट्टी संरक्षण : १४४८ हेक्टर
क्षमता : २.४० कोटी कंटेनर हाताळणी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version