मनसे – उपमुख्यमंत्री फडणवीसांची गुप्त बैठक

मनसे – उपमुख्यमंत्री फडणवीसांची गुप्त बैठक

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४,प्रतिनिधी : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. ती बातमी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट (शिवसेना ), भाजपा आणि अजित पवार गटाबरोबर राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा चौथा जोडीदार म्हणून या युतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे मंगळवारी (७ फेब्रुवारी रोजी) मनसेच्या प्रमुख नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘सागर’ बंगल्यावर भेट घेतली.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने मनसे भाजपाबरोबर युती करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाना उधाण येऊ लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version