वाशी, २७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री शिंदे यांनी वाशीत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यात आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले आणि त्यांच्या हाती अधिसूचनेची प्रत दिली. यानंतर मुख्यमंत्र्यांकडून फळाचा रस घेऊन जरांगेंनी उपोषण सोडले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या कानात काही तरी सांगितले. घटनास्थळी असलेल्या कॅमेऱ्यांमध्ये ही बाब रेकॉर्ड झाली. पण मुख्यमंत्री काय बोलले हे कोणालाही समजले नाही. जरांगेंना मुख्यमंत्र्यांनी अधिसूचनेविषयी महत्त्वाची माहिती कानात सांगितली असावी अशी चर्चा आता रंगली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.