वाशी, २६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाची मागणी करत असलेले मनोज जरांगे हे नवी मुंबईतील वाशी येथे आहेत. आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पण जरांगे मुंबईत जाऊन आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर ठाम आहेत. वाशीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जरांगेंच्या हस्ते राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. याप्रसंगी जरांगे यांनी मुंबईत जाऊन आझाद मैदानात आंदोलन करणार, असे सांगितले. राज्य शासनाचे शिष्टमंडळ सकाळी वाशीत जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे. या चर्चेनंतर जरांगे पुढील निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.