‘…तरी मुंबईत येणारच’

‘…तरी मुंबईत येणारच’

लोणावळा, २५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पण मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत. त्यांनी आझाद मैदानात जाणार असल्याचे सांगितले. आमचे आणि मुंबईकरांचे हाल होऊ नयेत याची काळजी राज्य सरकारला घ्यायची असल्याचे जरांगे म्हणाले. याआधी मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई पोलिसांनी जरांगेंना नोटीस बजावली आहे. मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी नाकारली असल्याचे मुंबई पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजावून सांगितले आहे.

‘मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेला यावं’

‘राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी चर्चेला यावं किंवा शिष्टमंडळ पाठवून चर्चा करावी. आम्ही चर्चा करू. पण आरक्षण हवंच आहे’; असे जरांगे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version