जरांगेंची खराडी – लोणावळा पदयात्रा

जरांगेंची खराडी – लोणावळा पदयात्रा

पुणे, २४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून समर्थकांसह मुंबईच्या दिशेने पदयात्रा सुरू केली आहे. ही पदयात्रा बुधवारी पुणे जिल्ह्यातील खराडी येथून लोणावळ्यापर्यंतचा टप्पा पार करणार आहे. मुंबईत प्रजासत्ताक दिनी पोहोचून मागणी पूर्ण होईपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे.

जरांगेंची पदयात्रा बुधवारी खराडी येथून निघून येरवडा, शिवाजीनगर, औंध मार्गे पिंपरी चिंचवड असा प्रवास करत जुन्या मुंबई-पुणे मार्गाने लोणावळा येथे मुक्कामासाठी पोहोचणार आहे. पदयात्रा निघणार असल्यामुळे बुधवारी सकाळी नगर रस्ता, शिवाजीनगर, गणेश खिंड रस्ता, औंध या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version