अयोध्या, २२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : ‘आज हमारे राम आ गये’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर श्रीराम मंदिरातून बोलताना पंतप्रधान मोदी यांनी हे वक्तव्य केले. वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर, त्याग आणि तपश्चर्येनंतर प्रभू राम आले, असे मोदींनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य आणि ऐतिहासिक राम मंदिरात प्रभू रामाची विधिवत पूजा करण्यात आली. दीर्घ प्रतीक्षेनंतर राम मंदिरात प्रभू रामाची मूर्ती विराजमान झाली. पूजेवेळी रामाच्या गाभाऱ्यात पंतप्रधान मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.