कडाक्याच्या थंडीत गरमागरम दुधाचा आस्वाद

कडाक्याच्या थंडीत गरमागरम दुधाचा आस्वाद

अयोध्या, २० जानेवारी २०२४, सायली पाटील : प्रभू रामाच्या स्वागतासाठी सजलेल्या अयोध्या नगरीत मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे. शनिवारी अयोध्येतले किमान तापमान आठ तर कमाल तापमान पंधरा अंश सेल्सिअस एवढे होते. या थंडीमुळे अयोध्येत ठिकठिकाणी पेटलेल्या शेकोट्या, स्वेटर घातलेले नागरिक असे वातावरण दिसत आहे. गरमागरम दूध विकणाऱ्यांकडे तसेच चहाच्या दुकानांपुढे गर्दी दिसत आहे. थंडीची तीव्रता वाढू लागल्यापासून गरमागरम बदामाचे दूध पिणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कुल्हडमधून गरमागरम बदामाच्या दुधाचा आस्वाद घेत नागरिक दिवसभराच्या कामाचा उत्साह कायम राखत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version