श्यामरंगी राम मूर्तीची पहिली झलक

श्यामरंगी राम मूर्तीची पहिली झलक

अयोध्या, १९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे देशभरातील राम भक्तांचे लक्ष आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे विधी १६ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. दररोज वेगवेगळे धार्मिक विधी होतील आणि २२ जानेवारी रोजी मुख्य पूजनानंतर प्रभू रामाच्या मूर्तीची गाभाऱ्यात अर्थात गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. गुरुवारी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू रामाची मूर्ती आसनावर स्थानापन्न करण्यात आली. या श्यामरंगी राम मूर्तीची पहिली झलक समाज माध्यमांत व्हायरल होत आहे.

बुधवारी रात्री प्रभू रामाची मूर्ती एका सजवलेल्या ट्रकमधून मंदिरात आणण्यात आली. हा ट्रक रामपथमार्गे हनुमानगढीमार्गे रामजन्मभूमी येथील मंदिरात पोहोचला. यानंतर मूर्ती मंदिरात आसनावर विराजमान करण्यात आली. शिल्पकार अरुण योगीराज यांनी ही ५१ इंच उंची असलेली प्रभू रामचंद्रांची मूर्ती साकारली आहे. अचल मूर्ती अद्याप झाकून ठेवलेली आहे. मुख्य पूजनानंतर प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण होतील. यानंतर मान्यवरांना २२ जानेवारी रामाचे दर्शन घेता येईल. नंतर २३ जानेवारीपासून सर्वांना प्रभू रामाचे दर्शन घेता येईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version