मुंबई, १८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले. तिसऱ्या दिवशी आणखी ४२ हजार ८२५ कोटींचे करार होणार आहेत. अशा रितीने ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याव्यतिरिक्त १ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याने राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत. या करारांमुळे राज्यात २ लाख इतक्या मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे. हे सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलदगतीने करण्याचा आमचा भर असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
गुंतवणूक करार झालेल्या उद्योगांची माहिती आणि रोजगार पुढीलप्रमाणे :
१६ जानेवारी – आयनॉक्स एअर प्रोडक्ट २५ हजार कोटी ( ५ हजार रोजगार ), बी सी जिंदाल ४१ हजार कोटी ( ५ हजार रोजगार), जेएसडब्ल्यू स्टील २५ हजार कोटी ( १५ हजार रोजगार), एबी इन बेव्ह ६०० कोटी ( १५० रोजगार), गोदरेज एग्रोव्हेट १००० कोटी ( ६५० रोजगार) अमेरिका स्थित डेटा कंपनी १० हजार कोटी ( २०० रोजगार)
१७ जानेवारी – अदानी ग्रुप ५० हजार कोटी ( ५०० रोजगार), स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ११५८ कोटी ( ५०० रोजगार), इंडियन ज्वेलरी पार्क ५० हजार कोटी ( १ लाख रोजगार), वेब वर्क्स ५ह्जार कोटी ( १०० रोजगार), लॉजिस्टिकमधील इंडोस्पेस,इएसआर, केएसएच, प्रगती, यांची मिळून ३५०० कोटी ( १५ हजार रोजगार), नसर्गिक संसाधानातील कॉन्गलोमिरेट कंपनी २० हजार कोटी ( ४ हजार रोजगार)
महाप्रीतने हरित उर्जा प्रकल्पांसाठी ५६ हजार कोटींचे करार केले. ते पुढीलप्रमाणे आहेत
अमेरिकास्थित प्रेडीक्शन्स समवेत ४ हजार कोटी, युरोपमधील हिरो फ्युचर एनर्जी मध्ये ८ हजार कोटी, जर्मनीच्या ग्रीन एनर्जी ३००० मध्ये ४० हजार कोटी, व्हीएचएम ओमान समवेत ४ हजार कोटी
१८ जानेवारीस पुढील सामंजस्य करार होतील- सुरजागड इस्पात १० हजार कोटी ( ५ हजार रोजगार), कालिका स्टील ९०० कोटी ( ८०० रोजगार), मिलियन स्टील २५० कोटी ( ३०० रोजगार), ह्युंदाई मोटर्स ७ हजार कोटी ( ४ हजार रोजगार ), कतारची एएलयु टेक समवेत २०७५ कोटी ( ४०० रोजगार), सीटीआरएल एस ( ctr s) ८६०० कोटी ( २५०० रोजगार)
१ लाख कोटींचे गुंतवणूक स्वारस्य
याशिवाय विविध उद्योगांनी १ लाख कोटींचे गुंतवणूक स्वारस्य दाखविले असून यात अर्सेलर निपॉन मित्तल तसेच सौदी, अरब, ओमान येथील उद्योगांचा समावेश आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.