‘कोकणवासियांनो जमिनी विकू नका’

‘कोकणवासियांनो जमिनी विकू नका’

अलिबाग, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या मराठ्यांच्या जमिनी जात आहेत… महाराष्ट्रातील सर्व उत्तम हिसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे… जमिनी विकाल तर कपाळावर हात मारण्याची पाळी येईल… अलिबागच्या जवळपासच्या गावांमधील जमिनी संपल्या मग येथील माणसं कुठे गेली जर का तुमच्या हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही, या शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलिबागमधील ग्रामस्थांना समजावले. याआधी राज यांनी निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. जमिनीच्या मुद्यावर ग्रामस्थांना समजावून सांगा, असे आवाहन राज यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केले. रुपयाला जमीन खरेदी करून सरकारला हजार रुपयाला विकणारे दलाल फिरत आहेत. जर रायगडमध्ये एखादा प्रकल्प सुरू होत असेल तर त्याच्यात भागीदार अर्थात प्रोजेक्ट पार्टनर व्हा असेही आवाहन राज ठाकरे यांनी अलिबागमधील ग्रामस्थांना केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version