मुंबई, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूवर वाहतूक सुरू झाली आहे. या सेतूवरून प्रवास करताना रस्त्यात थांबून सेल्फी काढणे अनेकांना भोवले आहे. पोलिसांनी आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त चालकांवर कारवाई केली आहे. अटल सेतूवर सेल्फी काढण्यासाठी वाहन थांबवल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. नियमाचे उल्लंघन केले म्हणून कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महामार्ग, उड्डाणपूल, सागरी सेतू, सेतू यापैकी कोणत्याही मार्गावरून प्रवास करत असताना ठोस कारणाशिवाय वाहन रस्त्यात थांबवण्यास सक्त मनाई आहे. अपघात झाला, टायर पंक्चर झाले अथवा बिघाड झाला तर सिग्नल देऊन वाहन एका बाजूस नेऊन थांबवता येते. एरवी रस्त्यावर वाहन थांबवण्यास सक्त मनाई आहे. सेल्फी वा फोटो काढण्यासाठी वाहन थांबवण्यास मनाई आहे. रस्त्याचा फोटो काढायचाच असेल तर त्यासाठी लेखी परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी सशर्त असते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.