मोदींच्या ‘रोड शो’मध्ये दिसली महायुती

मोदींच्या ‘रोड शो’मध्ये दिसली महायुती

नाशिक, १२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी २७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी नाशिकमध्ये दाखल झाले. नाशिकमध्ये त्यांनी युवा महोत्सवाच्या उद्घाटनाआधी निलगिरी बाग ते रामकुंडापर्यंत रोड शो केला. या रोड शो मध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासोबत उघड्या जीपमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. लवकरच होणार असलेल्या लोकसभा निवडणुकीला महायुतीतील घटक पक्ष संयुक्तपणे सामोरे जाणार असल्याचा संदेश ‘रोड शो’च्या माध्यमातून देण्यात आला.

वाहनात मोदींच्या उजवीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डावीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाठीमागे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते. याआधी मोदींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले. यावेळी बावनकुळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त (नाशिक शहर) संदीप कर्णिक उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी हे काळाराम मंदिरातही जाणार आहेत. याआधी मोदींनी रामकुंडाच्या परिसरात प्रतिकात्मक गोदास्नान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो साठी तपोवन परिसरात रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version