शिवसेना आमदाराचा अजब हट्ट

शिवसेना आमदाराचा अजब हट्ट

हिंगोली, ११ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेनेच्या आमदाराने एक अजब हट्ट केला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असून धनुष्यबाण चिन्ह देखील शिंदे यांच्याच शिवसेना पक्षाचे असल्याचा निकाल दिला आहे. या निकालानंतर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी अजब हट्ट केला.

आमदार संतोष बांगर यांनी हातात धनुष्यबाण घेत मतदारसंघात मिरवणूक काढली. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रासह देशावर महायुतीचा भगवा फडकणार असून देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी राहणार आहेत… तसे न झाल्यास आपण भर चौकात गळफास घेणार, असे वक्तव्य केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version