सारथी, बार्टी, महाज्योतीचा परीक्षेचा पेपर फुटला

सारथी, बार्टी, महाज्योतीचा परीक्षेचा पेपर फुटला

पुणे, १० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता परीक्षेत छायांकीत प्रतीच्या स्वरुपातील प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत. तर प्रश्न पत्रिका संचातील सी आणि डी प्रश्नपत्रिकेला सील नसल्याचे निदर्शनास आल्याने विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकत निषेध नोंदवला. परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षा कक्षात काही विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका खुल्या पध्दतीच्या होत्या, तर काहींना छायांकित प्रत देण्यात आल्याने गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन केले. याआधी २४ डिसेंबर २०२३ रोजी राज्य पात्रता परीक्षेसाठी (सेट किंवा एसईटी) २०१९ ची प्रश्नपत्रिका देण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version