मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार

मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार

नवी दिल्ली, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्जुन पुरस्कार देऊन गौरविले. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा अर्जुन पुरस्कार मिळालेला ५८ वा क्रिकेटपटू आहे. शमी व्यतिरिक्त २५ क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. मोहम्मद शमीने क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतले होते.

आतापर्यंत ५८ क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. यात १२ महिला क्रिकेटपटू आहेत. सुनील गावस्कार, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन या दिग्गज क्रिकेटपटूंनाही अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. शिखर धवनला २०२१ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता. यानंतर २०२२ मध्ये कोणत्याही क्रिकेटपटूला अर्जुन पुरस्कार मिळाला नव्हता. पण २०२३ साठी मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे झालेल्या सोहळ्यात मंगळवार ९ जानेवारी २०२४ रोजी मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version