पुणे, ०२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: राजकीय नाट्यात एकमेकांपासून फारकत घेतलेली शरद पवार आणि अजित पवार ही काका-पुतण्याची जोडी पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाने हा योग जुळवून आणला आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र येत असल्याने नाट्यसंमेलनाच्या मंचावर राजकीय नाट्याचा ‘अंक’ पहायला मिळेल का, याची उत्सुकता जनतेला लागली आहे.
शंभरावे अखिल भारतीय नाट्य संमेलन सहा आणि सात जानेवारीला पिंपरी-चिंचवड येथे रंगणार आहे. ६ जानेवारीला (शनिवारी) संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, माजी संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणूनही शरद पवार उपस्थित असतील.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.