जालन्यात वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी पूर्ण

जालन्यात वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी पूर्ण

जालन्यात, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठवाड्यात वंदे भारत एक्स्प्रेसचे आगमन झालेअसून लवकरच जालना – मुंबई रेल्वे धावणार आहे. जालना ते मनमाड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरन पूर्ण झाल्याने वंदे भारत ही आठ डब्याची रेल्वे उद्या धावणार आहे. या रेल्वेची जालना ते मनमाड दरम्यान यशस्वी चाचणी देखील घेण्यात आली आहे. ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी देखिल सुरू झाली असून केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे आणि जिल्ह्यातील सर्वच आमदारांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी रेल्वे प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुण कुमार जैन यांनी देखील जालना रेल्वे स्थानकाची पाहणी करत तयारीचा आढावा घेतला आहे. जालन्याहून वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार असल्याने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीचे ठरणार आहे तर शेतकरी आणि व्यावसायिक यांच्यासाठी फायदेशीर होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version