दोंदैचा, २७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : दोंदैचा येथून लामकानी येथे जात असलेल्या बसचा टायर फुटला. या अपघातात पाच महिला प्रवासी आणि बस चालक संजय बुधा कोळी हे सहा जण जखमी झाले. पण चालकाने बसवर लगेच नियंत्रण मिळवले. सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले आहे. बस दोंदैचा येथील बसस्थानकातून ३५ प्रवासी घेऊन वाडीमार्गे लामकानी येथे सायंकाळी सहा वाजता निघाली होती. बस मांडळ चौफुलीपासून एक किलोमीटर अंतरावर गेली असताना गाडीचे डाव्या बाजूचे टायर फुटले. पाच फूट अंतरावरच विजेचा खांब होता. पण चालकाने अखेरच्या क्षणी नियंत्रण मिळवून बस सावरली. यामुळे अपघात टळला.
जखमींची यादी
१. जनाबाई गोविंद पाटील
२. वत्सलाबाई हिलाल पाटील
३. अरुणाबाई सुरेश पाटील (रा. मांडळ)
४. आशाबाई विजय गोडसे
५. ललिताबाई संतोष चव्हाण (रा. अंजनविहीरे)
६. बस चालक संजय बुधा कोळी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.