केएल राहुलमुळे भारत २०० पार

केएल राहुलमुळे भारत २०० पार

सेंच्युरिअन, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरिअन येथे खेळवला जात आहे. या सामन्याचा पहिला दिवसाचा खेळ संपला. दिवसअखेर भारताने ८ बाद २०८ धावा केल्या. भारताकडून यष्टीरक्षक केएल राहुलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने नाबाद ७० धावा केल्यामुळे भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला.

भारताकडून यशस्वी जयस्वालने १७ धावा, कर्णधार असलेल्या रोहित शर्माने ५ धावा, शुभमन गिलने २ धावा, विराट कोहलीने ३८ धावा, श्रेयस अय्यरने ३१ धावा, केएल राहुलने नाबाद ७० धावा, आर. अश्विनने ८ धावा, शार्दुल ठाकूरने २४ धावा, जसप्रीत बुमराहने १ धाव आणि मोहम्मद सिराजने नाबाद शून्य धावा एवढे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने पाच, बर्गरने दोन आणि जॅन्सनने एक बळी घेतला.

भारत – दक्षिण आफ्रिका, पहिली कसोटी
पहिल्या दिवसाचा खेळ संपला
दिवसअखेर भारत ८ बाद २०८ धावा
मोहम्मद सिराज आणि केएल राहुल मैदानात
पावसामुळे पहिल्या दिवशी ५९ षटकांचा खेळ

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version