वंचितच्या सभेवेळी मंचाचा भाग कोसळला

वंचितच्या सभेवेळी मंचाचा भाग कोसळला

नागपूर, २५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर वंचित बहुजन आघाडीची स्त्री मुक्ती परिषद सुरू असताना मंचाचा बॅकड्रॉप लोखंडी अँगलसह खाली कोसळला. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. प्रकाश आंबेडकर मंचावर येण्याआधीच मंचाचा भाग कोसळला. अनेक प्रेक्षक समोर असताना ही घटना घडली. ही घटना घडताच काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मंचाच्या मागील भागात गेले. या प्रतिनिधींना वंचितच्या कार्यकर्त्यांनी अडवले. यावेळी काहींना धक्काबुक्की झाली. यामुळे थोडा वेळ वातावरण तापले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version