बँक घोटाळ्यात महाराष्ट्रातील काँग्रेस आमदार दोषी

बँक घोटाळ्यात महाराष्ट्रातील काँग्रेस आमदार दोषी

नागपूर, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात महाराष्ट्रातील काँग्रेसचा आमदार दोषी आढळला आहे. राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री तसेच आणि सध्याचे काँग्रेस आमदार सुनील केदार बँक घोटाळ्यात दोषी आढळले आहेत. नागपूर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सुनील केदार हे सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. केदार यांच्यासह एकूण सहाजण दोषी आढळले आहेत. बँक घोटाळ्यात सुनील केदार हे प्रमुख आरोपी होते. या प्रकरणात दोषी आढळल्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला धक्का बसला आहे. दोषींच्या शिक्षेवर सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी झाल्यानंतर शिक्षेचा निर्णय नागपूर न्यायदंडाधिकारी जाहीर करतील.

दोषी – सुनील केदार, अशोक चौधरी, केतन सेठ, सुबोध गुंडारे, नंदकिशोर त्रिवेदी, अमोल वर्मा

निर्दोष -श्रीप्रकाश पोद्दार, सुरेश पेशकर, महेंद्र अग्रवाल

नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेसचा आमदार अडचणीत
सुनील केदार यांच्यासह सहा जण दोषी
नागपूर न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version