कोरोनाने धास्ती वाढवली

कोरोनाने धास्ती वाढवली

मुंबई, २१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: देशभरात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने लोकांचं टेन्शन वाढलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन -१ चे नवीन २१ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन -१ चा पहिला रुग्ण ऑगस्ट महिन्यात लक्जमबर्ग या भागात आढळला. नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटलं की, मंगळवारी १९ डिसेंबर रोजी कोरोनाचे ५०० रुग्ण आढळले. तर गेल्या दोन आठवड्यात कोरोनामुळे १६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या रुग्णांना आधीपासूनच गंभीर आजार होते.

‘देशात कोरोनाचे २३०० सक्रिय रुग्ण आढळले आहेत. त्यात कोरोना व्हेरिएंट जेएन -१ चे २१ रुग्ण आहेत. या कोरोना व्हेरिएंटचा पहिला रुग्ण ऑगस्ट महिन्याच्या लक्जमबर्ग येथे आढळला. कोरोनाचा हा व्हेरिएंट हळूहळू ३६ ते ४० देशात पसरत चालला आहे. मात्र, या व्हेरिएंटला लोकांनी घाबरून जाऊ नये, मात्र आपण सतर्क राहिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version