१९४ किलो भेसळयुक्त पनीर जप्त

१९४ किलो भेसळयुक्त पनीर जप्त

नाशिक, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: नाशिकच्या अंबड लिंक मार्गावर अन्न आणि औषध विभागाकडून पुन्हा एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. अंबड लिंक रोड परिसरात एका कारखान्यावर अन्न आणि औषध विभागाकडून छापा टाकत १९४ किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे. या कारखान्यात भेसळयुक्त पनीर तयार होत असल्याची माहिती मिळाली होती. अन्न आणि औषध विभागाकडून छापा टाकत एक लाख रुपयांहून अधिक भेसळयुक्त पनीर आणि साठा जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध विभागाकडून अशा प्रकारे भेसळयुक्त पनीर आणि भेसळ दूध संदर्भात कारवाई केल्या जात आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version