चंपाषष्ठीनिमित्त शहर-जिल्ह्यातील मंदिरांवर रोषणाई

चंपाषष्ठीनिमित्त शहर-जिल्ह्यातील मंदिरांवर रोषणाई

नाशिक, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: चंपाषष्ठीनिमित्त आज घरोघरी पारंपरिक पद्धतीने तळीभरण, विधीवत पूजन आणि कुळधर्म-कुळाचाराचे पालन करून खंडेरावास नैवेद्योपचार अर्पण केले जाणार आहेत. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी स्थापण्यात आलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या घटांचे उत्थापनही आज करून गावोगावी ग्रामदैवत खंडोबाचा यात्रोत्सव बहरणार आहे. शहरात गोदाकाठ, पेठ रोड, देवळाली कॅम्प, मालेगाव, ओझर आदी ठिकाणी सालाबादप्रमाणे यंदाही पारंपरिक थाटात यात्रोत्सव, पूजाविधी आणि चंपाषष्ठीचा उत्सव साजरा होणार आहे. गोदाकाठच्या श्री खंडेराव महाराज मंदिरासह शहर-जिल्ह्यातील मंदिरांना रोषणाई करण्यात आली आहे. पेठरोडवरील पंचवटीचा मल्हार राजा देवस्थान ट्रस्टतर्फे दिवसभर विविध कार्यक्रम होतील.

सायंकाळी पाचला बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल. देवळाली कॅम्प येथील खंडोबा टेकडीवरही आज यात्रोत्सव साजरा होणार आहे. सकाळपासून पूजा, अभिषेक, वाघ्या-मुरळींच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक, मंदिरात महाआरती व महाप्रसाद आदींसह सायंकाळी ५.३० वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल. मंदिरात जागरण-गोंधळ, तर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल होईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version