गोंदिया, १७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील आमदार भास्कर जाधव हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून यावेळी कार्यकर्ता आणि अधिकारी मेळावा घेण्यात आले होते. यावेळी भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले की, या आधी गोंदिया विधानसभा मध्ये शिवसेनाचे वर्चस्व होते आणि दोनदा या ठिकाणावरून शिवसेनेचाच आमदार निवडून आले आहे. मात्र मध्यंतरी विश्वासघाताने शिवसेनेच्या उमेदवाराला पाळण्यात आले. त्यावेळेस पासूनच हे प्लान होते आणि त्यामुळे काँग्रेसच्या आमदार दोन वेळा निवडून आला. मात्र आता काँग्रेस, काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी असल्याने गोंदिया विधानसभा मतदार संघ हा सध्या अपक्ष आमदाराकडे आहे. तर हा मतदारसंघ मूड शिवसेनेच्या असल्यामुळे हा मतदारसंघ सेनेकडे राहील व सेनाच या मतदारसंघातून मतदान लढवणार असे आमदार भास्कर जाधव यांनी गोंदिया येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.