संभाजी नगर, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर येथे चिमुकले बहिण – भाऊ शाळा सुटल्यानंतर घराबाहेर खेळत असताना घरासमोरील एका पाण्याच्या खड्ड्यात पडून दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैव मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मैदानावरील एका मोकळ्या जागेतून मुरूम उत्खनन करण्यात आल्यामुळे तेथे मोठा खड्डा निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी त्यात अजूनही साचलेले आहे. या खड्ड्यात पडून दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैव मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये ठेकेदाराविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.