नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा

नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा

नागपूर, ११ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. शेतमालाला भाव नाही. सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करीत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. जनतेला वाऱ्यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजपा आणि फुटीरांच्या सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा ‘हल्लाबोल’ मोर्चा सोमवारी नागपूर विधानभवनावर धडकणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील ‘हल्लाबोल’ मोर्चात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, माजी मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version