धाराशिव, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या चौथ्या टप्प्यातील सभांना सुरवात झाली आहे. सध्या मनोज जरांगे पाटील हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. उमरगा येथे त्यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे, एक लाखाहून जास्त मराठा समाज उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडुन देण्यात आली आहे. ५१ जेसीबीतुन मनोज जरांगे पाटील यांच्या वर पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती देखील माहिती आयोजकांकडुन देण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.