जरांगेंचा फडणवीसांना इशारा

जरांगेंचा फडणवीसांना इशारा

मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मराठा समाज सध्या शांत आहे. देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की आम्हाला शांत राहू द्या. तुमच्या डोक्यातील विषारी विचार मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका आणि त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये कलह निर्माण करू नका. अन्यथा तुमचा सामना आमच्याशी आहे. फडणवीस यांनी आधी मोठेपणा दाखवला होता. त्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास बसायला लागला होता. पण आता त्यांनी पुन्हा खोड्या सुरू केल्याचं दिसत आहे. कारण मराठा आरक्षणाविरोधात जे लोक बोलत आहेत त्यामध्ये भाजपामधीलच काही मराठा नेतेही आहेत, जे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे फडणवीसांनी या नेत्यांना समज द्यावी, नाहीतर उघडपणे भूमिका जाहीर करावी. मगा आम्हीही बघून घेऊ. या नेत्यांना आवरलं नाही तर आम्ही तुमचं सगळंच बाहेर काढू ,” असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version