कुत्र्याच्या पिलाला जमिनीवर आदळणाऱ्याला पकडले

कुत्र्याच्या पिलाला जमिनीवर आदळणाऱ्याला पकडले

गुना, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कुत्र्याच्या पिलाला जोरात जमिनीवर आपटताना तसेच पायाखाली चिरडताना दिसत आहे. क्रूरतेची परिसीमा गाठणारा हा व्हिडीओ काही प्राणीप्रेमींनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि खासदार ज्योतिरादित्य शिंदे तसेच मध्य प्रदेश पोलीस यांना टॅग करून ट्वीट केला आहे. ट्वीट करणाऱ्या प्राणीप्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे. ट्वीट बघून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. पोलिसांना मुख्यमंत्र्यांकडून निर्देश येताच तातडीने कारवाई करून कुत्र्याच्या पिलाला जोरात जमिनीवर आपटणाऱ्याला पकडले. कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे.

https://twitter.com/rohanduaT02/status/1733549555780919407

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version