पुण्यात पुस्तक महोत्सव

पुण्यात पुस्तक महोत्सव

पुणे, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पुण्यात शनिवार १६ डिसेंबर २०२३ पासून रविवार २४ डिसेंबर २०२३ पर्यंत नऊ दिवस पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नॅशनल बुक ट्रस्ट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महापालिका यांनी संयुक्तपणे या पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने भारतीय भाषांतील शेकडो पुस्तके एकाच ठिकाणी बघण्याची संधी मिळणार आहे. हा उपक्रम फक्त प्रदर्शनापुरता मर्यादीत नाही. सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, सृजनशीलतेला चालना देणारे, वाचनसंस्कृतीचा विकास घडविणारे कार्यक्रम, प्रख्यात लेखकांच्या मुलाखती यांचेही आयोजन पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आले आहे. लोकसहभागातून हा महोत्सव साजरा केला जाईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version