मुख्यमंत्र्यांनी केले देशसेवेचे आवाहन

मुख्यमंत्र्यांनी केले देशसेवेचे आवाहन

नागपूर, ७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ध्वजदिन निधी संकलनात नागरिकांनी जास्तीत-जास्त योगदान देत देशसेवेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच, ध्वजदिन निधी संकलनासाठी स्वत:चे एक महिन्याचे वेतन देण्याची घोषणाही मुख्यमंत्री यांनी केली. ध्वजदिन निधी संकलनात देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त १८५ टक्के ध्वजदिन निधी संकलन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्याचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘हम करे राष्ट्र आराधन तन से, मन से, धन से, जीवन से’ या ब्रिदाप्रमाणे प्रत्येक भारतीयांनी आपल्या देशासाठी योगदान देण्याची गरज आहे. सीमेवर सैनिक देशरक्षणासाठी अहोरात्र तैनात असतात. देशाच्या प्रगतीतही सैनिकांचे योगदान महत्वाचे आहे. लष्कराच्या कल्याणासाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी देणारा ध्वजदिन निधी संकलनाचा उपक्रम अनेक वर्षांपासून राज्यात सुरू आहे. सैनिकांप्रती कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी ध्वजदिन निधी संकलनात योगदान देण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येण्याचे आवाहन, मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

https://twitter.com/mieknathshinde/status/1732650872642121908

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version