नागपूर, ६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये आहे. हे अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या कालावधीत पार पडेल. या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी अर्थात बुधवारी ६ डिसेंबर रोजी सत्ताधाऱ्यांनी चहापानाचे आयोजन केले होते. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला.
अधिवेशनाचे कामकाज सकाळी ११ वाजल्यापासून
हिवाळी अधिवेशनाचे कामकाज गुरुवार ७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. सत्ताधारी १९ विधेयके मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत तर विरोधक वेगवेगळ्या मुद्यांवर सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी करत आहेत.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी
हिवाळी अधिवेशन गुरुवार ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार २० डिसेंबर २०२३ या कालावधीत घेणार आहे. हिवाळी अधिवेशनाचे एकूण दिवस १४ असून, यामध्ये प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, तर सुट्या (शनिवार व रविवार मिळून) ४ दिवस आहेत.
हिवाळी अधिवेशनाचे ठिकाण – नागपूर
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी – ७ डिसेंबर २०२३ ते २० डिसेंबर २०२३
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.