राऊतांचा भुसेंवर हल्लाबोल

राऊतांचा भुसेंवर हल्लाबोल

मुंबई, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मंत्री दादा भुसे सत्तेचा गैरवापर करत असून, दादा भुसे यांच्यासह सर्व मंत्री भ्रष्ट आहेत. असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्यावर मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर शनिवारी सुनावणी आहे. या सुनावणी अगोदरच राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच “गिरणा सहकारी साखर कारखान्यासाठी जमा केलेले त्या शेतकऱ्यांचे १७८ कोटी कुठे गेले?” असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version