कोकणात दोन मुलींसह आईची आत्महत्या

कोकणात दोन मुलींसह आईची आत्महत्या

रायगड, २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : कौटुंबिक आणि आर्थिक आव्हानांमुळे निराश होऊन कोकणातील रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे दोन मुलींसह आईने आत्महत्या केली. रेल्वे खाली तिघींनी आत्महत्या केली.

वहिनी मला माफ करा, मी तुम्हाला बोलले पण माझ्याकडून होत नाही, मी दोन मुलींना घेऊन रेल्वे खाली आत्महत्या करायला जात आहे मोहनमुळे, असा संदेश मोबाईलवरून पाठवून महिलेने दोन मुलींसह आत्महत्या केली. मोहनला इकडे येऊन रूम सोडायला सांगा आणि माझे जे काही देणे आहे ते त्याला द्यायला सांगा असाही उल्लेख या संदेशामध्ये करण्यात आला होता. या संदेशाची माहिती रीना यांच्या मैत्रिणीला कळताच तिने तात्काळ गोरेगाव पोलिस स्टेशन गाठले. रीना यांनी त्यांच्या वहिनीला केलेला संदेश दाखवला. यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल सुरू केली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. रेल्वे खाली तिघींनी आत्महत्या केली होती.

गोरेगाव येथील गावडे संकुलात राहणाऱ्या रीना नायर यांनी चौदा वर्षांच्या जिया आणि अकरा वर्षांच्या लक्ष्मीसोबत आत्महत्या केली. कोकण कन्या एक्स्प्रेसखाली पहाटे तीन वाजता तिघींनी आत्महत्या केली. रीना यांना पहिल्या पतीपासून एक मुलगी झाली होती. नंतर रीना यांनी दुसरे लग्न केले होते. दुसऱ्या पतीपासून त्यांना एक मुलगी झाली होती. या दोन्ही मुलींसोबत रीना भाडेपट्टीवर एका खोलीत वास्तव्यास होत्या. पतीकडून पुरेशी आर्थिक मदत मिळत नव्हती. पती एकेठिकाणी आणि रीना दोन मुलींसह दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास होती. दोन्हीकडचे खर्च करण्यासाठी पैसा उभारणे पतीला शक्य नव्हते. रीना यांचे मोबाईलचे हप्ते थकले होते. दैनंदिन खर्च करणे कठीण झाले होते. यामुळे आलेल्या नैराश्यातून रीना यांनी मुलींसह आत्महत्या केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version