साखर उत्पादनात घट ?

साखर उत्पादनात घट ?

कोल्हापूर, २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या साखर उत्पादनात वीस टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी ९७० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात यंदा १ नोव्हेंबर पासून साखर हंगाम सुरू झाला. पण मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा १६ कारखाने कमी सुरू झाले आहेत. अनियमित पावसाचा फटका बसला आहे. ऊसाची लागवड आणि उत्पादन यातही घट झाली आहे. ऊस कमी असल्याने यंदा केवळ तीन महिने कारखाने सुरू राहण्याची शक्यता आहे.

मागच्या गाळप हंगामाच्या पहिल्या महिन्यात ८.६९ उतारा मिळाला होता. यंदाच्या गाळप हंगामाच्या पहिल्या महिन्यात ७.८३ उतारा मिळाला आहे. याचा फटका कारखान्यांबरोबरच शेतकऱ्यांनाही बसणार आहे. भावासाठी पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे बराच ऊस कर्नाटकात गेला. त्याचाही फटका महाराष्ट्रातील साखर उदयोगाला बसणार आहे. यंदा कारखाने १५० दिवसांऐवजी केवळ ९० दिवसच चालणार आहेत. यामुळे उत्पादन खर्चात वाढ आणि उत्पन्नात घट असा प्रकार होण्याचा धोका आहे.

साखर हंमाम तुलनात्मक – चालू हंगाम (२०२३ – २४) – मागील हंगाम (२०२२ – २३)

सुरू कारखाने – १७२ – १८८

ऊस गाळप – १६१.८६ लाख मेट्रिक टन – २२६ लाख मेट्रिक टन

साखर उत्पादन – १२६.७५ लाख क्विंटल – १९६.४७ लाख क्विंटल

उतारा – ७.८३ – ८.६९

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version