विठ्ठलचरणी भरघोस दान

विठ्ठलचरणी भरघोस दान

पंढरपूर, ०१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नुकतीच कार्तिकी यात्रा पार पडली. यानिमित्ताने लाखो विठ्ठल भक्तांनी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेत भरघोस दान दिले आहे. कार्तिकी यात्रेत विठ्ठलाच्या खजिन्यात चार कोटी ७७ लाख रुपयांची भर पडली आहे. महत्त्वाचे म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत १ कोटी ५६ लाख रुपयाची वाढ झाली आहे. विठ्ठल रुक्मिणी आणि सर्व परिवार देवतांच्या चरणावर ४० लाख १५ हजार रुपयांचे दान आले आहे. तर सात लाख रुपयांचे सोने, एक लाख ३१ हजार रुपयांची चांदी आणि इतर रक्कम देणगी रूपातून तसेच मंदिर समिती इतर उपक्रमातून मिळाले आहे. याबाबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version