धाराशिव, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : धाराशिव जिल्ह्यातील दहिफळ येथील खंडोबा मंदिर परिसरात अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले आहे. हे अतिक्रमण हटवावे यासाठी स्थानिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अतिक्रमणामुळे आठवडी बाजार, उत्सव सोहळा याच्या आयोजनावर परिणाम होत आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. मंदिर परिसरात विकास योजना राबवणे कठीण झाले आहे; असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.