छत्रपती संभाजीनगर, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जात गुरुवारी राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना धीर देण्यासाठी अतुल सावे यांनी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मोसंबी उत्पादक विराज गुशिंगे, डाळींब उत्पादक हरिभाऊ गंगाधर अंभोरे यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या बागांची पाहणी करत शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे अशांना लवकरात लवकर विमा मिळावा या दृष्टीने देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचं अतुल सावे यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाचे मुद्दे –
‘३ हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देणार’ – अतुल सावे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.