आरोग्याची वारी पंढरपूरच्या दारी

आरोग्याची वारी पंढरपूरच्या दारी

पंढरपूर, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने पंढरपूरच्या वाळवंटात यंदा ३ तंबू रुग्णालये उभारली आहेत. यात अतिदक्षता विभागाची पण व्यवस्था आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात ही व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटात आठ खाटांच्या ऑक्सिजन आणि जीवरक्षक यंत्रणेने सुसज्ज अशा अतिदक्षता विभागाची निर्मिती तंबूत करण्यात आली आहे. यामुळे आपत्कालीन प्रसंगात भाविकांना सहज औषधोपचारासह गंभीर आजारावरही उपचार शक्य होणार आहेत. त्यामुळे यंदाच्या वारीत आरोग्याची वारी पंढरपूरच्या दारी हे आरोग्य विभागाचे ब्रीद सार्थ ठरताना दिसत आहे.

पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी

कार्तिकी एकादशीच्या सोहळ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना पंढरपुरात आता भाविकांनी चंद्रभागेच्या तीरावर मोठी गर्दी केली आहे. चंद्रभागेचे स्नान करण्यासाठी सकाळपासूनच चंद्रभागेच्या काठावर भाविक हरिनामाचे गजर करतात. कार्तिकी यात्रेनिमित्त खास करून पंढरपुरात उजनी धरणातून भाविकांच्या स्नानासाठी पाणी सोडण्यात आले. उजनी धरणातलं पाणी आता पंढरपुरात येण्यास सुरुवात होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version