…म्हणून डोळ्यांच्या शस्रक्रिया थांबल्या

…म्हणून डोळ्यांच्या शस्रक्रिया थांबल्या

अमरावती, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र विभागातील कंत्राटी डॉक्टर आणि परिचारिका बेमुदत संपावर गेले आहेत.. या संपामुळे डोळ्यांच्या शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या आहेत. मागील २८ दिवसांपासून कंत्राटी कर्मचारी संपावर आहेत. यामुळे शेकडो रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया रद्द झाल्या आहेत. जिल्ह्यात फक्त अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागातच गरजूंसाठी डोळ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यामुळे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागात डोळ्यांवर शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी गरजू गर्दी करतात. सध्या संपामुळे या रुग्णांची पंचाईत झाली आहे. एरवी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागात दररोज किमान २५ ते ३० शस्त्रक्रिया फक्त मोतीबिंदूच्या असतात. डोळ्यांच्या इतर शस्त्रक्रिया पण तिथे होतात. पण सध्या या शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या आहेत. फक्त महत्त्वाच्या शस्त्रक्रिया सुरू आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version